कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला खेड स्थानकात दिलेला प्रायोगिक तत्त्वावरील थांबा कायमस्वरूपी करण्यात यावा, अन्यथा जनप्रक्षोभ उसळला तर सर्वस्वी जबाबदारी कोकण रेल्वे प्रशासनाची असेल, असा इशारा जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेच्या वतीने रविवारी दि. १ रोजी खेड रेल्वे स्थानकात निवेदन देऊन रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
