खेड : खेड होमगार्ड पथकातील आजी-माजी होमगार्ड जवानांचा नुकताच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी खेड होमगार्ड पथकातील तालुका समादेशक अधिकारी संजय कडू यांचा सत्कार माजी होमगार्ड तानाजीराव सावंत, नथुराम खेडेकर, मधुकर मोरे आदी होमगार्डनी केला.
तसेच तालका समादेशक संजय कडू यांनी सर्व होमगार्ड जवानांना कोव्हीड योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला होमगार्ड पथकातील जितेंद्र पवार, उदय मोरे, सचिन कडू, विनोद जाधव, केतन पेवेकर, सुरेश राठोड, रेश्मा दांडेकर आदी होमगार्ड उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 31-Jan-22