रत्नागिरी : दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सरोजिनी दामोदरन फाऊंडेशन मार्फत महाराष्ट्र शिष्यवृत्ती कार्यक्रम २०१९ अंतर्गत इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. स्टेट बोर्डात इयत्ता १० वीमध्ये ८० टक्केहून अधिक गुण आणि प्रत्येक विषयात ए प्लस श्रेणी (७५टक्के अपंग विद्यार्थ्यांना) असेल असे विद्यार्थी या शिष्यवृतीसाठी पात्र ठरणार आहेत. सरोजिनी दामोदरन फाऊंडेशन, कुमारी शिबुलाल आणि स. द. शिबुलाल यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत विद्याधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात शिकत असले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार आहेत. निवडक विद्यार्थ्यांना इयत्ता ११वी आणि १२ वीसाठी शिष्यवृत्ती रुपये ६ हजार प्रतिवर्षी दिले जातील. या विद्यार्थ्यांची प्रगती दरवर्षी उत्तमोत्तम राहिली तर त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १० हजार ते ६० हजार प्रतिवर्षी मिळतील. विद्यार्थ्यांनी Www.vidyadhan.org ह्या संकेतस्थळाला भेट देऊन २० ऑगस्ट २०१९ या कालवधीत अर्ज करावेत, असे आवाहन सरोजिनी दामोदरन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
