माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते खा. नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही असे चित्र असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत परंपरेचे एक अनोखे दर्शन राजधानी दिल्लीत सोमवारी दिसून आले. नारायण राणे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, शिवसेना नेते संजय राऊत, अरविंद सावंत यांनी संसद भवनात एकत्र बसून चहाचा अस्वाद घेत चर्चा केली. या नेत्यांनी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा केली याचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र, राणे आणि राऊत एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा वारसा ही नेतेमंडळी चालवत असल्याचे दिसून येते.
