जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्या ग्राहक पेठेचे उद्घाटन

0

रत्नागिरी : जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा करणार आहेत. उद्या बुधवार दि. ४ रोजी सकाळी ११.३० वाजता जे. के. फाईल्ससमोरील साई मंगल कार्यालयात प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन ८ मार्चपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here