साडवलीच्या फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय वेबिनार संपन्न

0

संगमेश्वर : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (साडवली) येथे संस्थापक अध्यक्ष रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरील फार्मसी विभागातील संशोधन आणि संशोधन प्रक्रिया या विषयावरील वेबिनार पार पडले.

HTML tutorial

मुंबई विद्यापीठ, जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ फर्मास्यूटिकल टीचर्स इन इंडिया (एपीटीआय) मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे वेबिनार झाले. जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. वीरेन्द्र श्रीवास्तव, प्रा. डॉ. मनीष कुमार गुप्ता डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश सोमाणी आणि साडवलीच्या इंदिरा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे वेबिनारमधील प्रमुख वक्ते होते.

डॉ. श्रीवास्तव यांनी फार्मसी विभागातील संशोधन, संशोधनाचे प्रकार आणि संशोधनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. राकेश सोमाणी यांनी ग्रीन केमिस्ट्री आणि त्याचा फार्मसी महाविद्यालयीन संशोधनातील उपयोग यावर माहिती दिली. डॉ. मनीष कुमार गुप्ता यांनी संशोधन प्रबंध आणि संशोधन प्रबंध लिहिण्याची पद्धत यावर उपयुक्त मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी संशोधन प्रबंधातील संदर्भ यावर मार्गदर्शन करताना संदर्भ लिहिण्याच्या पद्धती आणि संगणकीय सॉफ्टवेअरचा उपयोग करून संदर्भ लिखाणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

वेबिनारचा देशातील ५० महाविद्यालयांमधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here