चोरवणे येथे ८ मार्च रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

खेड तालुक्यातील चोरवणे येथे पंधरागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्रीराम वरदायिनी क्रीडा संकुलच्या मैदानावर नागेश्वर सेवा संघ चोरवणे पुरस्कृत साईनाथ क्रिकेट मंडळ चोरवणे गडकरवाडी यांच्यावतीने दि. ८ व ९ मार्च रोजी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातून संघ सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकास १५ हजार ५५५ रूपये आणि चषक, द्वितीय क्रमांकास १०,००१ रूपये आणि चषक, दोन्ही गटातील उपांत्य फेरी उपविजेता संघाना २५०१ रूपये आणि चषक तसेच सामनावीर, मालिकावीर, विकेट हॅट्रिक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सर्वाधिक षटकार तसेच प्रत्येक उपस्थित संघास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उपस्थित क्रीडा रसिकांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here