रत्नागिरी: लोकशाही दिनानंतर दाखल झालेल्या एकूण १६ तक्रार अर्जाबद्दलची दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बोलत होते. ‘तक्रार घेऊन जिल्ह्याच्या टोकावरून येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी तहसीलदारांनी तालुका लोकशाही दिन घ्यावा. त्यात न्याय न मिळाल्यास त्यांनी माझ्याकडे यावे. एवढेच नाही तर टोल फ्री क्रमांक, सॉफ्टवेअर याबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी पुढच्या महिन्यापासून व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारी देता याव्यात, यासाठी क्रमांक दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. दरम्यान, येणाऱ्या तक्रारींचा एका महिन्यात निपटारा होणार आहे. त्या अनुषंगाने यंत्रणा कामाला लावली जाईल, असे श्री. मिश्रा यांनी स्पष्ट केले.
