तर हा आहे पंतप्रधान मोदींचा प्लान…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला कायमचा रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा होत असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे. आणखी एका ट्वीटवरुन त्यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. येत्या रविवारी, सोशल मीडिया सोडणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री मोदींनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर विविध राजकीय तर्तवितर्क लावण्यात येत होते. मात्र याबाबतचं रहस्य पंतप्रधान मोदींनी आज उलगडलं. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिलांना आपलं सोशल मीडिया अकाऊण्ट वापरण्यास देणार आहेत, असं ट्वीट त्यांनी आज केलं आहे. त्यामुळे ते सोशल मीडियातून बाहेर पडण्याच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here