फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करू – बच्चू कडू

0

राज्यातील खासगी शाळा आणि विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये होणाऱ्या फी दरवाढीसंदर्भात आज विधानपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी उत्तर देताना संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, आणि यापुढे असे होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळांची मनमानी फी वाढ या विषयावर विधानपरिषद सभागृहात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले ”ज्या शाळा कायद्याखाली आल्या नाहीत, त्या शाळांचा अहवाल तपासून, माहिती घेऊन कायद्याखाली आणल्या जातील, तसेच शाळांमधील शुल्कवाढीसंदर्भात ज्या शाळा, संस्था पालन करत नाहीत, त्यांवर नवीन 2019 च्या सुधारणा कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करू. विशेष म्हणजे अशी कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला, तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here