नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती

0

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली.

नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. मात्र, आज या प्रकरणात उलट चित्र पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेण्यात आला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

पोलिसांची दादागिरी सुरु आहे. त्यांना कोर्टाचा अवमान करू दे, आम्ही सुप्रीम कोर्टात पाहू असं नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग सत्र न्यायलायानं दणका दिला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:12 PM 02-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here