शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

0

पुणे : पुण्यातील मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज, बुधवारी अल्प आजाराने निधन झाले.

मृत्यू समयी ते ७८ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून लिव्हर कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोघे भाऊ मधुकर व प्रकाश बाबर आहेत.

गजानन बाबर यांनी दोन वेळा आमदार आणि तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर गजानन बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी पुन्हा २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा पिंपरी शहरात सिंहाचा वाटा होता. नगरसेवक, आमदार व खासदार असा त्यांचा प्रवास राहिला. पाणीवाला आमदार म्हणून त्यांची ओळख होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 02-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here