पानवल धरणातील पाणीसाठा संपुष्टात

0

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन स्त्रोतांपैकी पानवल धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. पानवल धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरवासींयाची भिस्त आता शीळ आणि एमआयडीसीच्या पाण्यावर आहे. शीळ धरणात पुढील चार महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीच्या पंधरवड्यात संपुष्टात येतो. यावर्षीदेखील पानवलचा पाणीसाठा संपुष्टात आला आहे. पानवल धरणातुन दररोज दिड एमएलडी पाणी शहराला उपलब्ध होते. पानवल धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शीळ धरणातून जादा पाणी उचलण्यात येणार असल्याचे पाणी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. शीळ धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असून पुढील चार महिने शहराला दररोज पाणी उपलब्ध होईल इतका पाणीसाठा शीळ धरणात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. शहरातील एका कुटुंबाला दरमहा १५ हजार लिटर पाणी पुरवठा अत्यावश्यक असून शहरातील केवळ ९%च नागरीक १५ हजार लिटर पाण्याचा वापर करतात तर तब्बल ९१ टक्के नळधारक १५ हजारपेक्षा अधिक पाण्याचा वापर करीत आहेत. पाणी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नवीन पाणी योजनेचे काम सुरू आहे. नव्या योजनेचे काम मार्गी लागताच पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here