३७ प्रवाशांना घेऊन मुंबईमार्गे गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बसला भीषण आग

0

वैभववाडी : तालुक्यातील एडगाव ,घाडीवाडी येथे आज पहाटे ३.४५ च्या दरम्याने मुंबई ते गोवा जाणारी आरामबसला (मनीष ट्रॅव्हल्स) क्र GA 03/ W 2518 करूळ घाटात शॉर्टसर्किटने आग लागली.

पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या गाडीमध्ये एकूण ३७ प्रवाशी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली व कुडाळ पोलीस स्टेशनची संपर्क साधून अग्निशामक बंब आणण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या घटनेमुळे दोन तास घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 03-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here