साखरीनाटेतील गाझी मोहल्ला उर्दु कन्या शाळा ते हुना मास्तर रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

0

राजापूर : विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील यांच्या शिफाराशीने जिल्हा वार्षिक योजना २५/१५ कार्यकग््रमांतर्गत मंजूर झालेल्या साखरीनाटे गाझी मोहल्ला उर्दु कन्या शाळा ते हुना मास्तर रोड ते मुख्य रस्ता डांबरीकरण करणेच्या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी दहा लाखाचा निधी आ. पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे.

काँग्रेसचे राजापूर विधानसभा युवक अध्यक्ष नुईद काझी यांच्या विशेष प्रयत्न आणि पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे हा रस्ता करावा अशी या भागातील जनतेची मागणी होती. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. नुईद काझी यांनी यासाठी आ. पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत यासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध केला असून त्याचे कामही सुरू झाले आहे.

याप्रसंगी राजापूर विधानसभा युवक अध्यक्ष नुईद काझी यांच्यासह अल्पसंख्यांकचे सिकंदर हातवाडकर, नियाज मस्तान, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नरमुहम्मद पावस्कर, शफी मस्तान, शरफूद्दीन वाडकर,शफी वाडकर, साखरी नाटे सरपंच नौशाद धळवेळकर, सदस्य नौशाद पेज्ये, अशगर बांगी, सलाउद्दीन हातवाडकर, सर्फराज हुना, सर्फराज हातवाडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थानी आमदार बाळाराम पाटील भरत पाटील आणि महेश भुकंप यांचे विशेष आभार मानले आहेत. तर गेली कित्येक वर्षे मागणी असलेला हा रस्ता पुर्ण होत असल्याने या भागातील ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 03-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here