भारतातील कोरोनाची सद्यस्थिती…

0

सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता कोरोनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका पण खबरदारी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. दिल्लीमधील एका रुग्णामुळे आग्र्यातील 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. हैद्राबादमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. केरळात 3 जणांची प्रकृती आता स्थिर आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here