महाराष्ट्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही – आरोग्यमंत्री

0

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा शिरकाव आता भारतातही झालाय. भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संशयित रुग्ण अढळून आले आहेत. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे. ते विधान परिषदेत बोलत होते. राज्यात सहा कोरोना संशयित निरीक्षणाखाली होते. त्यामध्ये मुंबईतील चौघांचा तर पुण्यातील दोघांचा समावेश होता. परंतु त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याचं सांगत, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही टोपे यांनी केला. परदेशातून येणाऱ्या रुग्णांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. आतापर्यंत कोरोनावर कोणतंही अँटी व्हायरल ड्रग उपलब्ध नाही. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष सुरु केल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here