गुंड सचिन जुमनाळकरचे पिस्तुल शोधण्यात पोलिसांना यश

0

रत्नागिरी : पन्नास हजारांच्या खंडणीसाठी मोबाईल दुकान मालकांवर गोळी झाडलेले ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. गोळी झाडून खुनी हल्ला केल्यानंतर नामचीन गुंड सचिन जुमनाळकर याने कर्नाटकात पळून जाण्यापूर्वी हातखंबा येथील पोलिस वाहतूक मदतकेंद्राआधी असलेल्या पुलाखाली रिव्हॉल्व्हर लपवून ठेवले होते. पोलिसांनी सचिनला अटक केल्यानंतरही त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल कोठे आहे, हे सांगत नव्हता. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर ते कुठे ठेवले आहे, ते दाखविले. कर्नाटकला पळुन जाण्यापूर्वी त्याने हातखंबा येथे पुलाखाली गावठी पिस्तुल लपवून ठेवल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी तेथून हे पिस्तूल जप्त केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here