इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

0

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा 4 ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.

यानुसार परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावी परीक्षेतील अर्धमागधी (16) या विषयासह अन्य विषयांची परीक्षा 7 मार्च रोजी दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. याविषयापैकी फक्त अर्धमागधी (16) या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अशंत: बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी अर्धमागधी (16) या विषयासाठी वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला तपशिल पुढील प्रमाणे आहे. सोमवार 7 मार्च रोजी दुपारचे सत्र 3 ते 6.30 वाजेपर्यंत विषय सांकेताक अर्धमागधी (16) या विषयासाठी सुधारित तपशिल मंगळवार 8 मार्च दुपारी 3 ते 6.30 वाजेपर्यंत विषय साकेतांक अर्धमागधी (16) आहे.

इयत्ता 12 वी लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 04-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here