मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

0

रत्नागिरी : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.

उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राऊंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा यासाठी पोस्ट मॅट्रिकसाठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 04-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here