विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊची पोलीस कोठडी एक दिवसानं वाढवली

0

मुंबई : विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊची पोलीस कोठडी एक दिवसानं वाढवली आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा विकास फाटकवर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी इकरार खान याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली. पाठकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एक दिवसाने पाठकच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.

दरम्यान हिंदुस्तानी भाऊ म्हणाला, माझा कुठला राजकीय पक्षासोबत संबंध नाही किंवा मी कुठल्याही पार्टीमध्ये नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 04-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here