राज्यात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात ओसरणार; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

0

जालना : कोरोना संसर्गाचा फैलाव आणि राज्यातील मृत्यूदरामध्ये घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने निर्बंधांमध्येही सूट देण्यात आली आहे. मात्र, करोनाची तिसरी लाट कधी ओसरणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा फैलावामुळं राज्याची चिंता वाढली होती. मात्र, लसीकरण आणि आरोग्य विभागाच्या उपाययोजनामुळं परिस्थिती नियंत्रणात होती. नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात रुग्णसंख्येमध्येही घट दिसून आली. यंदा जानेवारी महिन्यामध्ये मृत्यूदरामध्ये घट झाली आहे. यामुळं राजेश टोपे यांनी निर्बंधांबाबत माहिती दिली आहे. जालन्यात ते प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलत होते.

शासनाचा कल हा निर्बंध कमी करण्याकडे असून जे काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. आता करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई- पुण्यातही संख्या कमी होत असल्याचं दिसतं आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी निर्बंध कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे, अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी होत आहेत. दर आठवड्याला आता निर्बंध कमी होत असल्याचं यापुढे पाहायला मिळेल, असंही टोपे म्हणाले. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ असं तज्ञांच्या मतावरून आपल्याला वाटत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 04-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here