आमदार नितेश राणे यांच्यावर २७ गुन्हे: शिवसेना नेते संदेश पारकर यांचे आत्मक्लेश आंदोलन

0

सिंधुदुर्ग : कणकवली-वागदे येथील गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज आत्मक्लेश आंदोलन केले.

कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या या पवित्र भूमीत भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर विविध प्रकारचे २७ गुन्हे दाखल आहेत. एखाद्या आमदारावर एवढे गुन्हे दाखल असण्याची ही पहिलीच वेळ आली. आपण चुकीच्या माणसाला निवडून दिले, त्यामुळे आप्पासाहेब आम्हाला माफ करा, अशी प्रार्थना करत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी हे आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी पदाधिकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वागदे येथील गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आज सकाळी १० वा . पासून संदेश पारकर यांनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यावेळी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते.

आत्मक्लेशामागील भूमिका सांगताना श्री. पारकर म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराला हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो आमदार अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीच्या भुमीतील आहे. आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडुन दिलेल्या चुकीचे प्रायश्चित लोकांच्यावतीने आपण हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले.

या आंदोलनाला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर , शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, बाळू पारकर आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 04-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here