कॅमेरा लावल्याने संबंधिताला न्यायालयीन कोठडी

0

रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे परिसरात राहणाऱ्या तरुणीच्या बाथरूमच्या छतामध्ये कॅमेरा लावून अश्लील चित्रफीत आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. शुभम तुळशीदास गावडे (२३, रा.सुपलवाडी नाचणे,रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित शुभम गावडे याने बाथरूमच्या छताचा सिमेंट पत्रा आणि लोखंडी अँगलमध्ये एक स्पाय कॅमेरा लावला होता. ही बाब पीडितेच्या लक्षात येताच तिने शहर पोलिसांकडे तक्रार दिली. शहर पोलिसांनी संशयिताला सोमवारी रात्री अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here