रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी महामार्गास राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यास तत्वता मान्यता केंद्र शासनाने दिली आहे. तरीही, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयातील सागरी महामार्गावरील पुलांची दुरुस्ती व रस्त्यांचे रुंदीकरण कामास आवश्यक तो निधी उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरून पर्यटनास चलना मिळून जिल्ह्याचा विकास करता येईल, अशी विनंती ना. उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांना केली आहे.
