लोटे येथे महिला दिनाचे औचित्य साधून नारी महोत्सवाचे आयोजन

0

खेड: लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स कंपनी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतर्फे सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत ६ ते ८ मार्च या कालावधीत लोटे येथील बँक ऑफ इंडिया समोर नारी महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील महिला बचत गटांना उद्योजकता विकसित व्हावी व महिला दिनाचा योग या उद्देशाने लोटे औद्योगिक वसाहती मधील घरडा कंपनीतर्फे सामाजिक दायित्व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात तालुक्यातील महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीसाठी तात्पुरती बाजारपेठ उभारण्यात येईल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here