‘कोठडी बघितली, की तब्येत बिघडते कशी?’, दिपक केसरकरांचा नितेश राणेंना खोचक सवाल

0

सावंतवाडी : तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून कोण रूग्णालयात दाखल झाले असेल. तर त्याची उत्तरे अधिकाऱ्यांना द्यावी लागतील आरोपीने कोठडी बघितल्यावर त्याची तब्येत बिघडते कशी? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते.

मी गृहराज्यमंत्री असताना असे प्रकार घडत असत त्यावेळी अधिकाऱ्यांना खात्री करण्याचे निर्देश देत होतो, आता असे कोणीतरी केले पाहिजे असा सल्ला माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी सरकारला दिला आहे.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बबन राणे, गुणाजी गावडे, अभिजीत मेस्त्री आदि उपस्थित होते. केसरकर म्हणाले,काहीजण सरकार राणे यांना मुद्दामहून अडकवतात असे सांगतात. पण त्याना जर सरकारला अडकवायचेच होते तर सर्वोच्च न्यायालयाने ही त्यांना दिलासा का दिला नाही असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सरकारवर टिका करणे योग्य नसल्याचे ही केसरकर यावेळी म्हणाले.

मी मंत्री असताना एका प्रकरणात आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी झाली होती. त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण देऊन रूग्णालयाचा आधार घेतला होता. पण मी तज्ञ डॉक्टरांना तिथे पाठवले, त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्याच्या तब्येतीला काही झाले नाही म्हणून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली.

कोणीतरी असे काम ठामपणे करू शकेलं का? असा सवाल केसरकर यांनी केला. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. आतातरी राणेंनी चांगले वागावे नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला. माझं कोण व्यक्तीगत दुश्मन नाही, पण सर्वानी चांगल वागले पाहिजे जिल्हा शांत राहिल पाहिजे तर या ठिकाणी समृद्धी येईल पर्यटन वाढेल मागील पाच वर्षांत कोणाचे डोकेवर काढण्याची हिम्मत झाली नव्हती. जास्ती जास्त पर्यटक जिल्ह्यात येत होते. पण पुन्हा दहशतीचे वातावरण झाल्यास पर्यटक कोण येणार नाही असे मत ही केसरकर यांनी यावेळी मांडले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 05-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here