तालिबान आणि अफगानीस्तात घमासान

0

तालिबानने शांतता करारला केराची टोपली दाखवल्यानंतर मंगळवारी रात्रभर केलेल्या हल्ल्यात 20 अफगाणी सैनिक आणि पोलिसांची हत्या केली. अमेरिका आणि तालिबानमध्ये शनिवारी शांतता करार झाला होता. मात्र तालिबानच्या अतिरेक्‍यांना सोडण्यास अफगानीस्तानने नकार दिला. त्यामुळे तालिबानने अफगाणी फौजांवर हल्ले सुरू ठेवणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. या करारात तालिबानचे अफगाण सरकारच्या ताब्यात असणाऱ्या एक हजार दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालीबानचे उपप्रमुख मुल्ला अब्दूल घानी बरादर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी ट्रम्प यांनी हिंसाचार कमी करण्याच्या अवश्‍यकतेवर भर दिला होता. अफगाणीस्तान सरकारशी बोलताना त्यांनी 40 वर्ष सुरू असणारा हिंसाचार कमी करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली होती.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here