राज्यसभेत युएपीए विधेयक मंजूर

0

नवी दिल्ली : राज्यसभेत युएपीए (बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक) विधेयक मंजूर करण्यात आले. यूएपीए विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता.२) राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी १४७ सदस्यांनी मतदान केले, तर विरोधात ४२ मते पडली. मोदी सरकारचे हे दुसरे यश आहे. याआधी तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. यावर राष्ट्रपतीचींही स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे तिहेरी तलाक कायदा अस्तित्वात आला आहे. या विधेयकातील तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवतेच्या विरोधात असतो असे सांगितले. तसेच युएपीए विधेयकाची भीती कशासाठी वाटते असा सवाल विरोधकांना केला. काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी यावेळी विधेयकाला विरोध दर्शवला. “या विधेयकात एनआयएला बळ देण्यासाठी असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे केंद्राला बळ देत एखाद्या व्यक्तीचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा किंवा काढण्याचा हक्क देण्यात आला आहे. विधेयकात करण्यात आलेल्या या खोडसाळपणाला आमचा विरोध आहे. आम्ही बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याला विरोध करत नाही असे पी चिदंबरम यांनी यावेळी म्हणाले. तर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या विधेयकाला विरोध केला आहे. भाजपच्या हेतूवर संशय असल्याचे सिंह म्हणाले. काँग्रेसने कधीच दहशतवादावर तडजोड केली नाही. म्हणूनच आम्ही हा कायदा आणला. तुम्हीच नेहमी दहशतवादावर तडजोड केलीत. एकदा रुबैया सईद यांच्या सुटकेदरम्यान आणि दुसऱ्यांदा मसूद अजहरची सुटका करुन हशतवादावर तडजोड केल्याचा आरोप असा आरोप दिग्विजय सिंह यांनी यावेळी केला. यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले “संघटनेवर बंदी असताना पुन्हा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित का करावे अशी विचारणा चिदंबरम करत आहेत. कारण आपण एका संघटनेवर बंदी आणली आहे. पण तीच व्यक्ती दुसरी संघटनाही सुरु करु शकते. मग आपण कधीपर्यंत संघटनांवर बंदी आणत राहायचं ?”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here