महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

0
Loading …

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात सोमवारी सार्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची 7 फेब्रुवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं त्यांच्या अधिकृत संकेत स्थळावर माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र मडाळाची परीक्षा 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. परंतु, लता मंगेशकर यांच्या निधनामुळं महाराष्ट्र शासनानं आज राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीआहे. यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

येत्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे, याची सर्व विद्यार्थी व संस्थांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळानं दिली आहे.

म्हाडाच्या परीक्षा वेळेतच होणार
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजेपासून ते 11:00 वाजेपर्यंत, दुपारी 12:30 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत तर, दुपारी 4 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 07-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here