देवरूख : शिव माथाडी कामगार सेनेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी दादा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
भारतीय कामगार सेना महासंघ संलग्न महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष नीलेश भोसले व महाराष्ट्र समन्वयक प्रमोद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सिद्धेश सुर्वे, तेजस भाटकर, निहार कोवळे, बंटी साने यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मुन्ना देसाई, तर संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी दादा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 07-Feb-22