गावातील धार्मिक कार्यात सहभाग घेऊ देत नसल्याप्रकरणी पवारसाखरी येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

0

गुहागर : अनुसूचित जमातीचे असल्याने पूर्ववैमस्यातून गावातील धार्मिक कार्यात सहभाग घेऊ देत नसल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेले वर्षभराहून अधिक काळ उच्च वर्गातील लोकांकडून आपल्याला व कुटुंबाला त्रास दिला जात असल्याची तक्रार विजय पालशेतकर (रा. पवारसाखरी, चिंचवाडी) यांनी दिली आहे. विजय पालशेतकर यांनी खाणीत होणाऱ्या सुरुंग स्फोटाविरोधात तक्रार दिली होती. यामुळे उत्खननाचा परवाना रद्द झाल्याने हे वाद सुरू झाले. तेव्हापासून सातत्याने आपल्याला त्रास दिला जात आहे. दमदाटी होत आहे. जातिवाचक शिवीगाळ केली जात आहे. तसेच धार्मिक कार्यापासून वंचित ठेवले जात आहे. आमच्या गायी-गुरांना मारहाण केली जात आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी त्यांनी गुहागर पोलिस ठाण्यात दिल्या आहेत.

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून संतोष उर्फ राजू काशिनाथ पवार, अंकुश शितप, महेश नाचरे, दीपक पवार, अनंत पवार, रवीकांत पवार (रा. पवारसाखरी, गुहागर) यांच्याविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 07-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here