रमाईंच्या त्यागाला तोड नाही : चंद्रकांत सावंत

0

चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांचे जीवन अलौकिक आहे. त्यांनी आपल्या जीवनात जो त्याग केला आहे, तो असाधारण असा आहे. त्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब घडू शकले. त्यांच्या त्यागाला तोड नाही, असे प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी येथे केले.

चिपळूण तालका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण यांच्या वतीने शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माता रमाईंना अभिवादन करताना ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे सहचिटणीस सुहास पवार, शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार, चिटणीस संदेश सावंत, रमाकांत सकपाळ, प्रभाकर सकपाळ, उल्हास कदम, राजू जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी संदेश पवार, संदेश सावंत, प्रभाकर सकपाळ यांनीदेखील रमाई यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पवार यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here