न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो

0

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय गानकोकिळेच्या जाण्याने जागतिक पातळीवरदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा फोटो झळकला आहे.

रविवारी 43 देशात लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू होते. याआधी देशातील लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर लागला होता. त्यामुळे या दोन्ही गायकांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता लता मंगेशकरांचा फोटो न्यू यॉर्क टाइम्सवर झळकला आहे.

लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here