पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर घणाघात, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतीवरील अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सरकारच्या यशस्वी योजना आणि वाटचालींबद्दल सभागृहाला माहिती दिली.

HTML tutorial

जोपर्यंत देशात कोरोना महासाथीचा आजार राहणार तोपर्यंत सरकार गरिबातील गरीब कुटुंबासाठी आयुष्य वाचवण्यासाठी जेवढा खर्च येईल, तेवढा खर्च सरकार करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

रोजगार वाढले

पीएम मोदी यांनी म्हटले की, कोरोना आधीच्या स्थितीची तुलना करता लॉकडाऊन उठवल्यानंतर नोकरभरतीत दोन पट वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या अहवालातही हाच कल दिसून आला आहे. अलिकडच्या वर्षांत IT क्षेत्रात 27 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

महागाईवर नियंत्रण

महागाईला रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 2014 ते 2020 या दरम्यानच्या काळात महागाईचा दर 4 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान होता. युपीएच्या काळाशी तुलना केली तर लक्षात येईल महागाई काय असते. आज देशाची अर्थव्यवस्था मोठी अर्थव्यवस्था होत असून विकासासोबत मध्यम महागाईचा सामना करत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला आहे अथवा महागाईचा उच्चांक गाठत आहे.

एमएसएमई आणि कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, एमएसएमआय आणि कृषी क्षेत्रात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी सरकारने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना अधिक एमएसपी मिळाला. पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे होते. MSME सेक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला अधिक निधी मिळाला. भारत आता सर्वाधिक मोबाइल उत्पादन करणारा देश ठरला आहे. ऑटोमोबाइल आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रात चांगले सकारात्मक वातावरण आहे.

कोरोना मानवी समुदायासाठी धोकादायक

कोरोना काळात गरिबांच्या सशक्तिकरणासाठी सरकारने प्रयत्न केले. 100 टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे आपण वाटचाल करत आहोत. कोरोना काळात 80 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले आहे.

गरिबांना लखपती केले

अनेक अडथळे असूनही लाखो गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. घरं मिळाल्याने गरीब आता लखपती झाले असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here