झोपेतून उठत असताना पडलेल्या एकाचा मृत्यू

0

रत्नागिरी : शहरातील टिळकआळी येथे, झोपेतून उठत असताना पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा.घडली.

संतोष बाळाजी घोसाळकर (४६, रा. घरकूल अपार्टमेंट टिळकआळी, रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील बाळाजी शंकर घोसाळकर (८२, रा. घरकूल अपार्टमेंट टिळकआळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी त्यांचा मुलगा झोपेतून उठत असताना हॉलमध्ये पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here