मालगाडीची धडक बसून चिपळुणात तरुण ठार

0

चिपळूण : शहरालगतच्या कळंबस्ते गमरेवाडीनजीक कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मालगाडीची धडक बसून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सुनील सीताराम भुवड (रा. कळंबस्ते वरचीवाडी) असे या अपघात मृत्यू ओढवलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली.

यशवंत केरू भुवड यांनी चिपळूण पोलिसांना माहिती दिली. सुनील भुवड याला दारूचे व्यसन होते. दि. ६ रोजी दुपारी ते कळंबस्ते ते गमरेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना एका मालगाडीने त्याला ठोकर दिली. यामध्ये त्याला मोठी दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here