म्हाप्रळ-आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद

0

मंडणगड : पुरार खेड राज्य महामार्गावरील म्हाप्रळ-आंबेत पूल निसर्ग व मानवनिर्मित कारणांनी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. सहा महिन्यांपूर्वी पुलाचे डागडुजीसाठी सुमारे बारा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. आंबेतकडून म्हाप्रळला येताना दुसऱ्या क्रमांकाचे पिलरला पाण्याखाली भागात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने वाहतूक सुरु असलेला व मंडणगड व दापोली तालुक्याचे लाईफ लाईन असलेला हा पूल तत्काळ बंद करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्याने अडचणींची शर्यत पार करत सुरु झालेली वाहतूक पुन्हा एकदा बंद झाली आहे.

महाड मधील सावित्री पूल दुर्घटनेनंतर नदीवरील पुलांच्या सुरक्षेच्या मुद्दा ऐरणीवर आला होता. तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१८ साली पुलाचे डागडुजीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नंतर पूल वाहतुकीसाठी बंद झाला. स्थानिकांचा गैरसोय होऊ नये या करिता म्हाप्रळ आंबेत जंगलजेटी चा खर्च करुन जलमार्गाची सोय करण्यात आली व कमी कालवधीत पुलाचे काम पूर्ण करण्यात आले व जून २०२१ ला पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी पुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी काही काळासाठी वाहतूक बंद ठेवण्याचे सूतोवाच यंत्रणेकडून करण्यात आले होते; मात्र या कामानंतर पिलर सरकलेला दिसत असल्याची तक्रारी स्थानिक ग्रामस्थ सातत्याने करताना दिसून आले.

या संदर्भात पाण्यात लेझर तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक क बाबीचे तपासणी करणारे तज्ज्ञांचे पथक म्हाप्रळ येथे चार दिवसांपूर्वी तपासणी केली या तपासणी पथकाने दिलेल्या अहवालाने यंत्रणेची झोप उडाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड यांचे अभियंत्यांची सभा होवून पूल बंद करुन त्याची अंमलबजावणी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या पुलावर मंडणगड तालुक्यातील वाहनांची सर्वाधिक वाहतूक होते. मात्र, या पुलाचे डागडुजी व देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड यांच्याकडे असल्याने स्थानिक यंत्रणाकडे या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या संदर्भात तहसीलदार मंडणगड यांच्याशी संपर्क साधला संबंधित कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून आपणास पुढील माहिती देवू, असे सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 09-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here