रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कामगारांची मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी मोहिमेला सहाय्य करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

त्याचबरोबर पर्यावरणपुरक कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. रनपचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांची मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य विभागाचे प्रमुख अविनाश भोईर, स्वच्छता निरिक्षक संदेश कांबळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:21 PM 09-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here