मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकास ५००० दंडाची शिक्षा

0

खेड: तालुक्यातील ओमली गावातील पचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक दिपक अनंत दळवी (५५) याला ५ हजाराची दंडाची शिक्षा खेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.२) सुनावली. या शिक्षेच्या विरोधात उच्व न्यायालयात अपील करणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. ही घटना दि. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी १ ते १.३० वा.च्या सुमारास शाळेच्या व्हरांड्यात घडली. पिडीत विद्यार्थीनी आणि तिच्या इतर मैत्रिणी इ. १० वी. च्या वर्गात शिकत होत्या. दि. २६ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या त्याच्या निरोप समारंभासाठी विद्यार्थींनींनी ड्रेस घालायचा कि साड्या नेसायच्या या विषयावर दि.२३ फेब्रुवारी २०१६ रोजी चर्चा सुरू असताना, विद्यार्थींनीनी याबाबत एका शिक्षकाला विचारले. त्यावेळी संपूर्ण ड्रेस घालून या, असे सांगितले. ही चर्चा सुरू असताना त्याच शाळेतील शिक्षक दिपक अनंत दळवी हे तिथून चालले असताना, त्यांनी चर्चा ऐकली आणि अंतवस्त्र घालून या, असे बोलून विद्यार्थींनीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने विद्यार्थींनींचा विनयभंग झाला. इ. १० वी.ची परीक्षा संपल्यावर विद्यार्थींनींनी  शिक्षक दिपक अनंत दळवी यांच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शिक्षक दळवी यांच्या विरोधात भादवि ५०९ पोस्का  व लैगिंक अपराध २०१२ कलम १२ प्रमाणे खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दि. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. तत्पुर्वी आरोपी शिक्षक दिपक अनंत दळवी यांची जामीनावर न्यायालयाने मुक्तता केली होती. सरकार पक्षाच्यावतीने ७ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूचे साक्षीदार, पुरावे, आरोपी व फियार्दीच्या सरकारी वकीलानी केलेला युक्त्विाद ग्राह्य धरून, आरोपीविरूध्द गुन्हा शाबीत झाल्याने, आरोपी दिपक दळवी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here