आंबवली शाळेस संगणक संच भेट

0

खेड : तालुक्यातील आंबवली जिल्हा परिषद शाळेला दि. ६ रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षक संघटना, तालुका खेडचे अध्यक्ष महेश राठोड यांच्या प्रयत्नातून जर्मनी येथे वास्तव्यास असलेले दीपक जाधव यांच्याकडून प्राप्त देणगीतून एक संगणक संच भेट दिला. हा संच मनोज पांचाळ व सौ. पांचाळ यांच्याहस्ते भेट देण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, आंबवलीचे अध्यक्ष संतोष आखाडे, उपाध्यक्ष साक्षी यादव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत आंबवली सदस्य संदीप कदम, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर, शिक्षक पवन पवार उपस्थित होते.

शाळेला संगणक संच दिल्याबद्दल संबंधितांचे आंबवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय यादव, सरपंच राजश्री यादव, पोलिस पाटील संदीप यादव, ग्रामस्थ चंद्रशेखर यादव, सर्व ग्रामस्थ व पालक यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 09-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here