लायन्स क्लब आणि लेन्स आर्ट रत्नागिरीतर्फे पटवर्धन हायस्कूलमध्ये छायाचित्र प्रदर्शन

0

पर्यावरण संरक्षण ही कल्पना मनात घेऊन लायन्स क्लब रत्नागिरी आणि लेन्स आर्ट रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेला अत्यंत जोरदार प्रतिसाद मिळाला असून, यामधील निवडक सर्वोत्तम शंभर फोटोंचे प्रदर्शन, रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या, नाटेकर सभागृहामध्ये शनिवार रविवार दिनांक ७ व ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन पहाण्यासाठी, सकाळी दहा ते रात्रौ ८ वाजेपर्यंत सर्वाना विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन लायन्स क्लब रत्नागिरी आणि लेन्स आर्ट रत्नागिरीच्या पदाधिका-यानी सर्व रत्नागिरीकरांना केले आहे. प्राणी जीवन, पक्षीजीवन, वनस्पती जीवनासोबत शहरी आणि ग्रामीण लॅन्डस्केपसचे उत्तम फोटोग्राफ्स प्रदर्शनामध्ये समाविष्ट असून आपल्या सभोवतालचा निसर्ग, त्यातली जैवविविधता, मानव आणि निसर्ग यातला संबंध आणि संघर्ष हे विषय छायाचित्रांच्या माध्यमातून मांडणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. पर्यावरणातील महत्वाच्या घटकांचं चित्रण यातुन लोकांसमोर येईल. आपल्या भागातील समृद्ध जैवविविधतेची त्यांना जाणीव होईल आणि पर्यावरण संरक्षणातला त्यांचा सहभाग वाढेल अशी अपेक्षा संयोजकानी व्यक्त केली आहे.

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here