हातखंबा येथे दुचाकी घसरून दाम्पत्य जखमी

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातरांभोळकरीण मंदिरापुढे दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकीवरील पती किरकोळ जखमी झाला असून पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची ही घटना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. घडली. बुधवारी सकाळी मंगेश भिकाजी भोंगल (४२, रा. तारवेवाडी हातखंबा) हे आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दचाकी (एमएच-०८ एएच२३६८) वरून पत्नील निराली हिला सोबत घेऊन तारवेवाडी ते शांतीधाबा असे जात होते. ते रांभोळकरीण मंदिरापुढे आले असता त्यांच्या दुचाकिचे चाक खड्ड्यात गेल्याने ती घसरुन हा अपघात यात मंगेशच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताबाबत अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 10-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here