भरणे येथे लागला वणवा

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडीनजीक बुधवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा भडकला. यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळणवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व आगीवर नियंत्रण मिळवले.

तालुक्यातील डोंगर भागात गेल्या काही दिवसांपासून वणवा लागण्याचे प्रकार दिसत आहेत. दि. ९ रोजी दुपारी २ च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गालगत भरणे गावातील शिंदेवाडी येथे अचानक वणवा भडकला. या परिसरात आठ ते नऊ घरे असून तेथे शेतकऱ्यांनी पावटा, कडवा यांची लागवड केली आहे. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

येथील महिला, पुरुष व लहान मुलांनी घरातून बादली, कळशा यांचा वापर करून पाणी आणून आग नियंत्रणात आणणण्यासाठी प्रयत्न केले. काही तरुणांनी झाडांच्या डहाळ्या काढून त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र सुमारे तीन ते चार एकर परिसरात वणव्याने सुकलेल्या गवत व झाडांची राख केली. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात धूर पसरला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 10-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here