गुहागर: मोडकाआगर धरणात मेहताब रफीक हाजू या महिलेचा मृतदेह आढळला. मेहताब रफीक हाजू (४३, रा. चिपळूण) हिचा मृतदेह मोडकाआगर धरणातील गुहागर नगरपंचायतीच्या पंप हाऊसजवळ कामगारांना आढळून आला. याची खबर रफीक हाजू यांनी गुहागर पोलिसात दिली. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सदर घटनेची फिर्याद दाखल झल्यानंतर गुहागर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. सदर तपास ए.एस.आय. पवार करीत आहेत.
