जिल्ह्यातील २५४९ शेतकऱ्यांची कर्जरक्कम बँकेमध्ये जमा

0

रत्नागिरी: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २५४९ शेतकऱ्यांची ४ कोटी ४३ लाख ८२ हजार रुपये रक्कम बँकांमध्ये जमा झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १८,६२८ शेतकरी निकषानुसार, पात्र ठरले आहेत. त्यातील, २५४९ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४३ लाख ८२ हजार ७५१ रु. ची रक्कम बँकामध्ये जमा झाली असून ती शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here