‘काँग्रेसमुक्त भारत’ हा प्रत्येक नागरिकाचा संकल्प, गोव्यात भाजपचं सरकार येणार : नरेंद्र मोदी

0

पणजी : गोव्यात आल्यावर मनोहर पर्रिकरांची आठवण येते, माझ्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्यांना गोव्याची संस्कृती माहिती नाही त्यांनी गोव्याला लुटण्यासाठी गोव्याचा एटीएमप्रमाणे वापर केला. पण भाजपने गोव्याचा विकास केला. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेसमुक्त भारत आता प्रत्येक भारतीयाचा संकल्प असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “गोव्यात पर्यटन वाढलं तर देशाचंही पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी भाजपने पायाभूत सुविधांचा विकास केला. या आधीच्या सरकारच्या डोक्यात हा विषय नव्हता. ते दिल्लीत बसायचे आणि फक्त पर्यटनासाठी गोव्यात यायचे.”

आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “गोव्याच्या भूमीतच मी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. आता भारताच्या प्रत्येक नागरिकाने तसा निश्चय केला आहे.
पर्यटकांची वाढलेली संख्या म्हणजे गोव्याच्या विकासाचा दाखला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या आधीच्या सरकारांनी गोव्याचं महत्त्व कधीही ओळखलं नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसने गोव्याच्या विकासावर कधीही लक्ष दिलं नाही, आता भाजपचे सरकार गोव्याचा विकास करतंय असंही ते म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुकांमुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. राज्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 11-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here