सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला अखेर मंजुरी

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. यावर्षी १०० सीटसाठी एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरुवारी दिली.

कॉलेजच्या मंजुरीसाठी १५ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तपासणी झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विशेष लक्ष घालून दोन दिवस त्या मेडिकल कॉलेजच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून राहिल्या आणि त्रुटींची पूर्तता करून घेतली. दरम्यान राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं मंजुरी मिळण्यासाठी लेटर ऑफ परमिशन दिली आहे. त्यामुळे आता मेडिकल कॉलेजला अथक प्रयत्नांनंतर मंजुरी मिळाली आहे. दरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी आणि १०० सीट प्रवेशासाठीसुद्धा मान्यता मिळाली असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. मेडिकल कॉलेजच्या प्रवेशामध्ये दुसऱ्या राउंडमध्ये यावर्षीसाठीच प्रवेश दिला जाणार आहे. मेडिकल कॉलेजच्या उर्वरित सुविधा पूर्ण करून लवकरच मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत कृती समितीच्या माध्यमातून प्रतिक्रीया देण्यात आली आहे. यात असे म्हटले आहे की, जिल्हावासीय २०१७ पासून यासाठी लढा देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती, जिल्हा सिंधुदुर्गच्या नेतृत्वात हा लढा उभा राहिला. १३० ग्रामसभांचे ठराव, उपोषण, २५ हजार पत्र लेखन, रक्तदान आंदोलन, इमेल/ ट्विटर च्या माध्यमातून केलेला पाठपुरावा, निवेदने असे अनेक मार्गांनी हा विषय नेतृत्वापुढे लावून धरला. त्यामुळे हे परवानगी मिळाली आहे.

यासाठी प्रशासनाने सुद्धा अथक प्रयत्न केले. विशेष म्हणजे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बांधवांनी हा विषय सतत लावून धरल्यामुळे दबाव कायम होताच. या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी चांगले डॉक्टर घडणार तसेच सिंधुदुर्गातील जनतेची गोवा, बेळगाव, कोल्हापूर, डेरवण, मुंबई पर्यंत होणारी पायपीट थांबून उत्तम दर्जाची सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होणार, यात काही शंका नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदर विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी यानी या निमित्ताने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 11-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here