मिनी बस लांबवल्याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल

0

चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर एकाने आठ लाख रूपये किंमतीची टाटा कंपनीची मिनी बस मालकाला न विचारता परस्पर विक्रीसाठी नेली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी योगेश यशवंत मोरे (२५, रा.आंबडस) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास शहरातील शोभ्रा हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी ३ रोजी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत राजाराम तानाजी जोईल (रा. सिद्धी अपार्टमेंट, पागनाका चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शोभ्रा हॉटेल या ठिकाणी मिनी बस संमतीशिवाय विक्रीसाठी घेऊन जात असता पटवर्धन लोटे येथे सापडली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करीत असून हा प्रकार नेमका कोणत्या व्यवहारातून झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here