गुहागरमध्ये करिअर गाईडन्स कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

गुहागर : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी युवा क्रीडा व कार्य मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने गुहागर कीर्तनवाडी येथील संत तुकाराम छत्रालय येथे करिअर गाईडन्स आणि कौन्सिलिंग कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा प्रणिता साटले, नगरसेवक माधव साटले, नगरसेविका स्नेहा भागडे, पोलिस उपनिरीक्षक श्री. कदम, मार्गदर्शक प्रभू हंबर्डे, सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, डॉ. प्रदीप आठवले, पत्रकार मंदार गोयथळे, गुहागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर भागडे, समाज मंदिर कीर्तनवाडी येथील पदाधिकारी व ५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ बेंडल स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम घुमे होते. दहावी, बारावी, पदवीनंतर पुढे काय याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. करियर गायडन्स हा एक स्तुत्य उपक्रम असन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस उपनिरीक्षक कदम म्हणाले की, युवकांनी ध्येयवेडे होणे आवश्यक आहे. अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक तयार करावे. सातत्य आणि चिकाटी यामुळे निश्चित यश मिळते असे ते म्हणाले. मार्गदर्शक प्रभू हंबर्डे यांनी, जीवनात ध्येयनिश्चितीचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितले. मनोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 11-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here